18 JAN 2017 MAKAR (CAPRICORN)
सचिन मधुकर परांजपे commented on this.
मकर रास....राशीचक्रातील नावडती राणी
मी आज गेली कित्येक वर्षे ज्योतिष मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत आहे. रोज नवनव्या माणसांशी ओळखी,चर्चा त्यांचे प्रश्न,समाधान, मार्गदर्शन मी करत असतो. माझ्या आजवरच्या निरिक्षण व अभ्यासानुसार राशीचक्रातील बारा राशींपैकी "मकर" ही एकमेव रास अशी आहे की जिच्या नशिबी अखंड त्रास,कटकटी आणि विवंचना सुरु असतात. मकरेची व्यक्ति एखादा हमाल असो की कोट्याधीश त्याला त्याच्या आयुष्यात कोणतीतरी चिंता,कटकट किंवा काहीतरी त्रास असतोच. राशीस्वामी शनिमहाराज आहेत पण शनिच्या कुंभ आणि मकर या अधिपत्याखाली असलेल्या दोन राशींपैकी बुध्दीमत्ता, मानसन्मान, प्रतिष्ठा, धनसंपत्ती या गोष्टी कुंभेला मिळाल्या आहेत पण मकरेच्या वाटेला मात्र प्रयत्नवाद, कष्ट, दगदग आणि सतत अवहेलनाच आलेली अनुभवास येते. मकर ही रास जबरदस्त महत्वाकांक्षी, धैर्यवान व प्रयत्नवादी आहे पण या सर्व गुणांना अनुलक्षून जे यश,लाभ पदरी पडायला हवं ते या राशीच्या नशिबात अगदी क्वचितच बघायला मिळते असा माझा अनुभव आहे.
अत्यंत विरोधाभासात्मक आयुष्य ही मंडळी जगत असतात...म्हणजे भरपूर छान शारिरीक बळ असते, अफाट प्रयत्नशक्ति असते तर पैसा नसतो....पैसा असला तर आरोग्य चांगले नसते....पैसा आणि आरोग्य उत्तम असेल तर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अपमान,अवहेलना व त्रास घडत असतात...मकरेला एकंदरीत आयुष्यात प्रगतीच्या संधीच कमी मिळतात असा माझा अनुभव आहे. मकर व्यक्तिंनी आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचा पुरेपुर फायदा करुन घ्यायला हवा असं माझं मत आहे...आणि आयुष्यात अतीभावनाप्रधानता (Emotional aspect) कटाक्षाने टाळून अत्यंत स्पष्ट व प्रयत्नवादी धोरण ठेवायला हवे. कर्मयोगी रहायला हवे...देवधर्म आणि प्रयत्नवादात समन्वय ठेवायला हवा. अन्यथा मकरेची भावनिक फसवणूक करणारे चोर जागोजागी उभे असतात. चाणाक्षपणा, धोरणीपणा, कावेबाजपणा व स्पष्टवक्तेपणा मकरेत नसल्याचा गैरफायदा अनेकदा व्यवहारात घेतला जातो असा अनुभव आहे. मकर व्यक्तिंनी स्वत:चा मानसिक तोल अजिबात ढळू देऊ नये...खंबीर रहावे. नशा आणणाऱ्या पदार्थांपासुन नुकसान संभवते. आलेला पैसा थोडाफार बचतीकडे वळवून बाकीच्या पैशाचा स्वत:साठी आणि स्वत:च्या आनंदासाठी, छंदसाठी व हौसेसाठी उपभोग घ्यावा, तसे न केल्यास मकरेच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा Regrets (पश्चात्तापात) व्यतित होतो...स्वत:साठी काहीही न केल्याचा त्यांना पश्चात्ताप होत रहातो....
राशीचक्रातील ही नावडती राणी भले कधीच आवडती राणी झाली नाही तरी चालेल पण तिने स्वत:चे आयुष्य उपभोगायला हवे आणि आनंदात रहायला हवे असं मला मनापासुन वाटते....
“मकर रास - प्रयत्न आणि दैववादाचा समन्वय”
©लेखक-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
©लेखक-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
कालच्या लेखात आपण मकर राशीच्या विषयी थोडं जाणून घेतलं...मकर रास ही राशीचक्रातील (इतर राशींच्या तुलनेत) थोडी अधिक कष्टदायी व तरीही भाग्योदयाच्या दृष्टीने नकारात्मक रास असते असं माझं निरिक्षण आहे. आज आपण या राशीसंदर्भातील काही महत्वाचे अन्य मुद्दे व राशीसाठी अत्यावश्यक दैवी उपाय जाणून घेणार आहोत....
सर्वप्रथम मकर रास ही मागेच सांगितल्यानुसार अत्यंत जबरदस्त इच्छाशक्ति असलेली, अफाट प्रयत्नवादी व मेहनती रास आहे. या राशीमधला बुध्दीतत्वाचा भाग हा प्रयत्न व शारिरीक धावपळीपेक्षा तुलनेत कमी असतो. मकर राशीच्या व्यक्तिंनी कोणत्याही गोष्टीची सुरुवात किंवा प्रारंभ करण्याअगोदर त्या गोष्टीची बौध्दिक बाजू जाणून घ्यायला हवी. म्हणजे इच्छाशक्ति व क्रियाशक्तिला ज्ञानशक्तिची जोड द्यायलाच हवी म्हणजे आपले भावी प्रयत्न वाया जातील का? याचा अंदाज अगोदरच येतो. अंदाज आल्याशिवाय निर्णय घेऊ नयेत. मकरेने आततायीपणे घेतलेले सर्व निर्णय चुकतात असा अनुभव आहे. मकर राशीत अनुक्रमे उत्तराषाढा, श्रवण व धनिष्ठा अशी तीन नक्षत्रे येतात. ही तिन्ही नक्षत्रे प्रयत्नवादाची मानली जातात त्यामुळे आपल्याला आयुष्यात अचानक धनलाभ, छप्पर फाडके पैसा, लॉटरी, जुगारात यश मिळेल असा दृष्टीकोन मकर मंडळींनी सहसा ठेवू नये. अत्यंत प्रॅक्टीकल पण सकारात्मक दृष्टीने आयुष्याकडे पहावे. १ + १ = २ हेच उत्तर योग्य व तर्कशुध्द असते. त्याचे उत्तर ३ किंवा ३० येणार नाही हे ध्यानात ठेवावे पण त्याचबरोबर १+१=० होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
व्यवहारिक पातळीवर सकारात्मक किंवा Positive विचार करणे ही आजकालची फॅशन असली तरी मकर व्यक्तिंनी एखाद्या उपक्रमात/प्रोजेक्टमध्ये किंवा धंदाउद्योगात सुरुवात करण्याआधी यदाकदाचित त्यात अपयश आले तर काय काय नुकसान होऊ शकते याचे रिडींग आपल्यापुरतं करुन ठेवावं, भावी नुकसानीचा आराखडा मनात तयार करुन ठेवला की आपल्याला एकदम धक्का लागत नाही (आणि यश आलं तर आनंद द्विगुणीत होतो तो भाग वेगळाच) शक्यतो शेअर्स किंवा Easy money च्या मागे जाऊ नये (तुम्हाला कष्टानेच व प्रयत्नाने धनप्राप्ती होते हे तुम्हालाही माहिती असेल) अन्न, वस्त्र, निवारा, लोखंड, कापड, फिल्म इंडस्ट्रीमधील तंत्रज्ञान, क्रिडाक्षेत्र, उष्णतानिर्मिती, आणि काही प्रमाणात ट्रान्स्पोर्ट ही क्षेत्रे व्यवसाय म्हणून तर नोकरीत वरिल क्षेत्रांसोबत कम्प्युटर हार्डवेअर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, वकिली, सरकारी नोकरी मकरेला लाभदायक ठरते. व्यवहारिक पातळीवर मकरेने आयुष्यभर सावधपणा, प्रयत्नवादी दृष्टीकोन, कष्टप्रधानता, नुकसानीचे कॅल्क्युलेशन या गोष्टी अंगिकारुन अतिभावनाप्रधानता टाळावी असा सल्ला आवर्जून देत आहे. सेवाभावी वृत्तीचा अतिरेक करुन स्वत:चा मौल्यवान वेळ, श्रम व पैसा याचे नुकसान करुन घेऊ नये...
©लेखक-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
©लेखक-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
काही दैवी/आध्यात्मिक उपाय उपासना......
खालील काही दैवी उपाय/उपासना यांचा अंगिकार मकरेने केल्यास आयुष्यातील कष्ट/नकारात्मकता यांची तीव्रता प्रकर्षाने कमी होते. खालील उपायांपैकी तुम्हाला रुचतील ते एक किंवा दोन उपाय केले तरी पुरेसे आहेत. मात्र या उपासना प्रदीर्घकाल कराव्यात, त्यात सातत्य असावे...
©लेखक-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
©लेखक-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
१) मकर राशीत तेजतत्वाची कमतरता बरेचदा जाणवते त्यामुळे मकर ही शनिची रास असली तरी मी आवर्जून श्रीसूर्य-उपासना करण्याचा सल्ला देतो आहे. मकरेच्या व्यक्तिंनी रोज सूर्योदयापासुन १ तासाच्या आत स्नान वगैरे करुन पूर्वाभिमुख (East Facing) बसून गायत्री मंत्राचा जप किमान २४ वेळा करावा. रविवारी १०८ वेळा करावा. गायत्री मंत्राचा उच्चार कठीण वाटत असेल तर त्याऐवजी
॥ ॐ ऱ्हींम सूर्याय नम: ॥ (Om Rheem Suryaay namaha) हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. उगवत्या सूर्याला नमस्कार करावा....
॥ ॐ ऱ्हींम सूर्याय नम: ॥ (Om Rheem Suryaay namaha) हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. उगवत्या सूर्याला नमस्कार करावा....
२) मकरेचा राशीस्वामी शनि असल्याने अर्थातच मकरेला शनिउपासनाही लाभदायक ठरते असा अनुभव आहे. रोज सकाळी स्नानानंतर श्रीशनिमहाराजांचे स्मरण करुन अत्यंत नीट व शुध्द शब्दोच्चारात खालील शनिमालामंत्र एकदा वाचणे अत्यंत लाभदायक ठरते यात वादच नाही. शनिमाला मंत्र अत्यंत प्रभावी, न्यायहितकारक व संरक्षक आहे. आगामी साडेसातीच्या काळात मकरेला शनिमालामंत्र तारक ठरेल यात वादच नाही. श्रीशनिमहाराजांवर संपूर्ण श्रध्दा ठेवून या मंत्राचा जप करावा...हे संपूर्ण स्तोत्र म्हणजे एक मालामंत्र मानला जातो
***अस्य श्रीशनैश्चरमालामन्त्रस्य काश्यप ऋषिः, अनुष्टुप् छन्दः,
शनैश्चरो देवता, शं बीजं, निं शक्तिः, मं कीलकं,
समस्तपीडा परिहारार्थे शनैश्चरप्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ।
शनैश्चरो देवता, शं बीजं, निं शक्तिः, मं कीलकं,
समस्तपीडा परिहारार्थे शनैश्चरप्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ।
ॐ नमो भगवते शनैश्चराय मन्दगतये सूर्यपुत्राय महाकालाग्नि-
सदृशाय क्रूर (कृश) देहाय गृध्रासनाय नीलरूपाय चतुर्भुजाय
त्रिनेत्राय नीलाम्बरधराय नीलमालाविभूषिताय धनुराकारमण्डले
प्रतिष्ठिताय काश्यपगोत्रात्मजाय माणिक्यमुक्ताभरणाय छायापुत्राय
सकलमहारौद्राय सकलजगतभयंकराय पंगुपादाय क्रूररूपाय
देवासुरभयंकराय सौरये कृष्णवर्णाय स्थूलरोमाय अधोमुखाय
नीलभद्रासनाय नीलवर्णरथारूडाय त्रिशूलधराय सर्वजनभयंकराय
मन्दाय दं, शं, नं, मं, हुं, रक्ष रक्ष, मम शत्रून्नाशय,
सर्वपीडा नाशय नाशय, विषमस्थशनैश्चरान् सुप्रीणय सुप्रीणय,
सर्वज्वरान् शमय शमय, समस्तव्याधीनामोचय मोचय विमोचय,
मां रक्ष रक्ष, समस्त दुष्टग्रहान् भक्षय भक्षय, भ्रामय भ्रामय,
त्रासय त्रासय, बन्धय बन्धय, उन्मादयोन्मादय, दीपय दीपय,
तापय तापय, सर्वविघ्नान् छिन्धि छिन्धि,
डाकिनीशाकिनीभूतवेतालयक्षरक्षोगन्धर्वग्रहान् ग्रासय ग्रासय,
भक्षय भक्षय, दह दह, पच पच, हन हन, विदारय विदारय,
शत्रून् नाशय नाशय, सर्वपीडा नाशय नाशय,
विषमस्थशनैश्चरान् सुप्रीणय सुप्रीणय, सर्वज्वरान् शमय शमय,
समस्तव्याधीन् विमोचय विमोचय, ॐ शं नं मं ह्रां फं हुं,
शनैश्चराय नीलाभ्रवर्णाय नीलमेखलय सौरये नमः ॥**
सदृशाय क्रूर (कृश) देहाय गृध्रासनाय नीलरूपाय चतुर्भुजाय
त्रिनेत्राय नीलाम्बरधराय नीलमालाविभूषिताय धनुराकारमण्डले
प्रतिष्ठिताय काश्यपगोत्रात्मजाय माणिक्यमुक्ताभरणाय छायापुत्राय
सकलमहारौद्राय सकलजगतभयंकराय पंगुपादाय क्रूररूपाय
देवासुरभयंकराय सौरये कृष्णवर्णाय स्थूलरोमाय अधोमुखाय
नीलभद्रासनाय नीलवर्णरथारूडाय त्रिशूलधराय सर्वजनभयंकराय
मन्दाय दं, शं, नं, मं, हुं, रक्ष रक्ष, मम शत्रून्नाशय,
सर्वपीडा नाशय नाशय, विषमस्थशनैश्चरान् सुप्रीणय सुप्रीणय,
सर्वज्वरान् शमय शमय, समस्तव्याधीनामोचय मोचय विमोचय,
मां रक्ष रक्ष, समस्त दुष्टग्रहान् भक्षय भक्षय, भ्रामय भ्रामय,
त्रासय त्रासय, बन्धय बन्धय, उन्मादयोन्मादय, दीपय दीपय,
तापय तापय, सर्वविघ्नान् छिन्धि छिन्धि,
डाकिनीशाकिनीभूतवेतालयक्षरक्षोगन्धर्वग्रहान् ग्रासय ग्रासय,
भक्षय भक्षय, दह दह, पच पच, हन हन, विदारय विदारय,
शत्रून् नाशय नाशय, सर्वपीडा नाशय नाशय,
विषमस्थशनैश्चरान् सुप्रीणय सुप्रीणय, सर्वज्वरान् शमय शमय,
समस्तव्याधीन् विमोचय विमोचय, ॐ शं नं मं ह्रां फं हुं,
शनैश्चराय नीलाभ्रवर्णाय नीलमेखलय सौरये नमः ॥**
३) मकर व्यक्तिंनी अन्नदान व वस्त्रदानावर अधिक भर ठेवावा. गरजु आणि सत्पात्री व्यक्तिंना अन्नदान व वस्त्रदान करणे आधिदैविक दोषांवर रामबाण उपाय आहे (आधिदैविक दोष म्हणजे वरवर तर्कशुध्दता न दिसताही सतत घडणारे अप्रिय प्रसंग व कटकटी)
४) शनिवारी सूर्योदयापासून ते रविवार सूर्योदयापर्यंत मकर व्यक्तिंनी कटाक्षाने मांसाहार आणि मद्यपान टाळावे ही गोष्ट मी अत्यंत अगत्याने व मनापासुन सांगतो आहे. राशीस्वामी शनिमहाराजांना मांस-मद्याचा अत्यंत तिटकारा आहे हे लक्षात ठेवावे त्यामूळे निदान त्यांच्या वारी मकर व्यक्तिंनी हे बंधन कटाक्षाने पाळावे ही विनंती. शनिवारी शक्यतो मांस, अंडी, धातू, चामडे यांची (कोणत्याही स्वरुपातील) खरेदी करु नये.
५) आर्थिक अडचणीवर मात होण्यासाठी उपाय क्रमांक २ मधील शनिमाला मंत्राचे वाचन केल्यानंतर मकर व्यक्तिंनी "श्रीमहालक्ष्मीअष्टक" वाचणे खुप लाभदायक असेल. महालक्ष्मीअष्टक स्तोत्र हे धनप्राप्ति आणि धनस्थैर्यासाठी अतिशय लाभदायक मानले जाते. मकर व्यक्तिंना हे स्तोत्र खुप शुभ आहे.
६) मकरेच्या आयुष्यातील रखरखीतपणा, कष्ट व पीडांचे निवारण होण्यासाठी मकर व्यक्तिंनी दर शनिवारी संध्याकाळी मारुती मंदिरात/किंवा शनिमंदिरात जाऊन शनि/मारुतीवर तीळाचे तेल (अगदी चार चमचेही चालेल) अर्पण करावे. ज्या देवळात स्वत:हून तेलाभिषेक करता येईल असेच देऊळ निवडावे. शनि/मारुतीला स्निग्ध अशा पदार्थांचे म्हणजे शनिला प्रिय असलेल्या तीळाच्या तेलाचे अभ्यंग केल्यानंतर आयुष्यातील पीडांची तीव्रता बऱ्याच अंशी कमी व्हायला मदत होते. मकर व्यक्तिंनी शक्य असल्यास वर्षातून एकदा तरी श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे किंवा इतर कोणत्याही जागृत शनिक्षेत्री जाऊन दर्शन,प्रार्थना करुन येणे अगत्याचे आहे.
.....मकर मित्रांनो-मैत्रिणींनो अशा पध्दतीने प्रयत्नवाद,कष्ट व दैवीउपाय उपासना यात समन्वय ठेवल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेची तीव्रता कमी व्हायला सुरुवात होते यात वादच नाही हे लक्षात ठेवावे. वरील लेखातील मुद्द्यांना सकारात्मकतेने घेऊन अत्यंत नित्यनेमाने व सातत्याने ते उपाय-उपासना केल्यास लाभ होतील यात वादच नाही. कृपया लेख फेसबुकवर/व्हॉटसपवर लेखकाच्या नावासह शेअर करावा/ तुमच्या परिचयातील मकरेच्या मित्रमैत्रिणींना लेखकाच्या नावासह फॉरवर्ड करावा ही विनंती. ज्योतिषमित्रांनी खोडसाळपणे माझे नाव खोडून स्वत:चे नाव टाकल्यास कडक शिक्षा द्यायला श्रीशनिमहाराज समर्थ आहेत हे विसरु नये....
-लेखक सचिन मधुकर परांजपे (पालघर)
ज्योतिष,भाग्यरत्न, रुद्राक्ष-पारद मूर्ती मार्गदर्शक
09823124242 (पूर्वनियोजित वेळेनुसारच भेटावे)
ज्योतिष,भाग्यरत्न, रुद्राक्ष-पारद मूर्ती मार्गदर्शक
09823124242 (पूर्वनियोजित वेळेनुसारच भेटावे)
No comments:
Post a Comment